ठाणे -ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या मुरबाड ( Murbad Nagarpanchayat Election ) आणि शहापूर नगर पंचायतीच्या ( Shahapur Nagar Panchayat Election ) सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही तालुक्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. ऐन वेळी मुरबाडचे शिवसेना प्रमुखाने भाजपच्या तंबूत दाखल होत उमेदवारी अर्ज भाजपच्यावतीने दाखल केला. तर शहापूर नगर पंचायतीत निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षांनी ( Bacchu Kadus Prahar Janshakti in Shahapur ) शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
ओबीसी प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी ऐनवेळी राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने त्याला मुरबाडमधील भाजपचे आमदार किसन कथोरे ( BJP MLA Kisan Chathore slammed state gov ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करीत स्थगितीला विरोध केला. त्यांनी सर्वच नगरपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. तर प्रहार अपंग संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष शरद पाटील ( Prahar Sanghatana Murbad Taluka ) यांनी मुरबाड मधील १७ ही जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी प्रशांत तेलवणे ( Prashant Telvane as candidate in Murbad election ) नावाच्या दिव्यांगाला उमेदवारी देऊन सर्वच राजकीय पक्षांना बुचकळ्यात पाडले आहे. तर सर्वच राजकीय पक्षाला बंडखोरीची लागण होऊन अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावित आहेत.
हेही वाचा-shivsena joining upa Possibility - शिवसेनेच्या युपीए प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेणार - खासदार संजय राऊत
मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतमध्ये १७ -१७ जागेसाठी निवडणूक
जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतमध्ये १७ - १७ जागेसाठी निवडणूक होत आहे. मुरबाड नगरपंचायत ही सध्याच्या घडीला भाजपच्या ताब्यात आहे. तर शहापूर नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या एक वर्षापासून दोन्ही नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. परंतु नुकताच निवडणूक आयोगाने निवडणूकी जाहीर करताच ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापले आहे. त्याशिवाय सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना, भाजप, काँग्रेस , राष्ट्रवादी या चार प्रमुख पक्षांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपल्या उमेदवारांचे अर्ज आज दाखल केले.