ठाणे श्रीनगर पोलीस ठाण्यात Shrinagar Police Station in Thane कार्यरत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या police woman hanged herself in police station केल्याने चांगलीच खळबळ माजली. अनिता भीमराव व्हावळ असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. Thane police woman suicide दोन मुली, पती असा वाव्हळ यांचा परिवार आहे. या घटनेबाबत श्रीनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
घरगुती वाद ठरला आत्महत्येचे कारणअनिता या श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत होत्या. वारंवार पतीसोबत भांडण आणि घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. काल रात्री जेवणावरून अनिता वाव्हळ आणि तिचे पती भीमराव वाव्हळ यांच्यात वाद झाले होते. या वादामुळे अनिता यांच्या निराशेमध्ये आणखी भर पडली असा अंदाज पोलीस वर्तवत आहे.