ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना स्वीकारण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बंदुका उघड्यावर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचा हा निष्काळजीपणा कोणाच्याही जीवावर बेतू शकतो. याआधी देखील पोलिसांची हत्यारे पळवून नेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
ठाण्यात पोलिसांचा निष्काळजीपणा; मानवंदनेआधी बंदुका 'बेवारस' - thane police news
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना स्वीकारण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बंदुका उघड्यावर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाण्यात पोलिसांचा निष्काळजीपणा; मानवंदनेआधी बंदुका 'बेवारस'
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत सकाळी सहापासून पोलीस प्रशासनाचे जवान तैनात आहेत. मात्र, संबंधित कार्यक्रम वेळेत पूर्ण न झाल्याने बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांकडून हे कृत्य झाल्याचे समोर येत आहे.