महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एनसीपीचा गद्दार म्हणत; अजित पवारांच्या प्रतिमेला चपलेने बदडणारे पोलिसांच्या ताब्यात - Nationalist Congress Latest News

राज्याच्या राजकारणात आज पहाटे राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. याचे पडसाद कल्यामध्ये उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

अजित पवारांच्या प्रतिमेला चपलेने बदडले

By

Published : Nov 23, 2019, 4:34 PM IST

ठाणे - राज्याच्या राजकारणात आज पहाटे राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादीचे विधी मंडळाचे गटनेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. त्याचबरोबर अजित पवारांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यतच्या राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली. त्याचे पडसाद कल्याणमध्येही उमटले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला चपला व जोड्याने बदडत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

अजित पवारांच्या प्रतिमेला चपलेने बदडले

याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे. असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असून एकत्र राहणार असून अजित पवार यांची हकालपट्टी केल्याची सांगितले. त्यानंतर ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवत आपला रोष व्यक्त केला. कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देखील अजित पवार यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष उमेश बोरगावकर यांनी पुरोगामी सरकार, महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं सरकार यावं म्हणून पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकरी झगडत असताना अजित पवार यांनी मात्र आज भाजपला साथ देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या पक्षविरोधी भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे सांगत अजित पवार गद्दार आहेत. आम्ही राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता शरद पवारांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे सांगितले.

दरम्यान जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत सर्वच राजकीय कार्यकर्त्यांना जमावबंदीची नोटीस बजावली होती. तर यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोड्याने मारत अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. बाजारपेठ पोलिसांनी माजी नगरसेवक जववाद डोन, पदाधिकारी संदीप देसाई, जिल्हा उपाध्यक्ष उमेश बोरगावकरसह आदी कार्यकर्ते-पदाधिकऱ्यांना ताब्यात घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details