महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोलीस भरतीसाठी कॉपी बहाद्दरांची नामी शक्कल; मास्कमध्ये आणला मोबाईल - Mobile gadget

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरातील ब्लु रिडज स्कुलमध्ये मास्क मोबाईलचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलिसांनी मास्क मोबाईल जप्त केला असून मास्क मोबाईलमध्ये असलेल्या सीम कार्डच्या माध्यमातून हिंजवडी पोलीस कॉपी बहादूराचा शोध घेऊन कारवाई करणार आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

कॉपी बहाद्दरांना अटक
कॉपी बहाद्दरांना अटक

By

Published : Nov 20, 2021, 2:07 PM IST

पिंपरी-चिंचवड- पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी एका कॉपी बहदूराने नामी शकलं लढवली आहे. त्यासाठी एका कॉपी बहादूराने अक्षरशः मास्क मध्ये मोबाईल असेंमबल केलं आहे. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कॉपी बहादूराच्या प्रयत्नात खीळ लावली आहे. परिक्षा केंद्रावर केलेल्या कसून तपासामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा मास्क वाला मोबाईल गॅजेट जप्त केला आहे. मात्र मास्क चेक करत असताना कॉपी बहाद्दर पोलिसच लक्ष विचलित करुन अचानक फसार झाला आहे. याप्रकरणी मुख्य परीक्षार्थी आणि डमी परीक्षार्थी या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी दिली.

पोलीस भरतीसाठी कॉपी बहाद्दरांची नामी शक्कल

मुनाफ हुसेन बेग अस डमी परिक्षार्थीचे नाव आहे तर प्रकाश रामसिंग धनावत असे मुख्य परिक्षार्थीचे नाव आहे. परीक्षा संपण्यास अवघे पाच मिनिटे बाकी असताना डमी परिक्षार्थीचे बिंग फुटलं आहे. दरम्यान, परीक्षा उत्तीर्ण होण्यास मुनाफ ला प्रकाश धनावत हा आठ लाख रुपये देण्यास असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बावधन येथील अरीहंत इन्स्टिट्यूट येथील परीक्षा केंद्रावर डमी परीक्षार्थी बसवला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, संबंधित केंद्रावर जाऊन पाहणी केली असता प्रकाश धनावत च्या जागी डमी मुनाफ हा परीक्षार्थी म्हणून बसला होता. अगोदर तोच परीक्षार्थी असल्याचं ठाम पणे सांगत होता. मात्र, प्रकाश च्या सह्या करण्यास सांगितल्यानंतर तो मुख्य परीक्षार्थी नसल्याचं समोर आलं. या प्रकरणी दोघांना देखील अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरातील ब्लु रिडज स्कुलमध्ये मास्क मोबाईलचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलिसांनी मास्क मोबाईल जप्त केला असून मास्क मोबाईलमध्ये असलेल्या सीम कार्डच्या माध्यमातून हिंजवडी पोलीस कॉपी बहादूराचा शोध घेऊन कारवाई करणार आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस दलातील 720 पदांसाठी आज पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर शहारातील 444 केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील या भरती साठी जवळपास 1 लाख 90 हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे. जि ए सॉफ्टवेअर ही खासगी कंपनी पिंपरी चिंचवड पोलिस दलासाठी परीक्षा घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details