महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही - इमारतीचा भाग कोसळला

भाईंदरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

part of the building has collapsed in Bhayander
भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, जीवित हानी नाही

By

Published : May 18, 2021, 4:20 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) -भाईंदर पश्चिमेच्या गणेश गल्लीमधील महेश नगर इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी अग्निशामक दालाच्या जवानांनी धाव घेत तब्बल 72 रहिवाशांना रेस्क्यू केले आहे.

भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, जीवित हानी नाही
इमारतीचा भाग कोसळला मात्र जीवितहानी नाही -भाईंदर पश्चिमेच्या गणेश गल्ली मध्ये ३५ वर्षापेक्षा अधिक जुन्या महेश नगर इमारतीचा काही भाग कोसळला. सकाळी सहाच्या सुमारास इमारतीचा पहिल्या ते तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीचा भाग तुटला. घटनास्थळी मीरा भाईंदर अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल ७२ जणांना रेस्क्यू केले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. इमारतीच्या रहिवाशांना भाईंदर पश्चिमेच्या सेकेंडरी शाळेतमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच रहिवाशांचे महत्त्वाचे सामान काढण्याचे काम सुरू आहे.

७२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले -

घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त दिलीप ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, स्थानिक पोलीस निरीक्षक मुगुतराव पाटील यांच्यासह मुख्य अग्निशामक अधिकारी प्रकाश बोराडेंनी घटनास्थळी भेट दिली. सदर इमारत खाली करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून बचावकार्य करत ७२ जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. इमारतीमध्ये एकूण ३९ सदनिका आहेत. इमारत धोकादायक नसल्याची माहिती पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details