ठाणे - प्रेषित मोहम्मद यांच्या विषयी २७ मे रोजी एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ( nupur sharma controversial statement ) भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्यावर भिवंडीत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी त्यांना १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावले होते. त्या अनुषंगाने आज (१३ जून रोजी ) शर्मा यांना पोलीस ठाण्यात जबाबासाठी हजर राहावे लागणार होते. मात्र नुपूर शर्मा यांनी आणखी चार आठवड्यांची मुदत पोलिसांकडे मागितली आहे. विशेष म्हणजे रविवारी रात्री उशीरा नुपूर शर्मा यांनी वकिलांमार्फत भिवंडी पोलिसांकडे ई-मेलद्वारे ही मुदत मागितली आहे.
माध्यमावर वादग्रस्त विधान करून मुस्लिम धर्मियांच्या भावना होत्या. रजा अकॅडमीचे सदस्य वकास अहमद सगीर अहमद मलिक (४०) यांनी ३० मे रोजी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मावर भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी १० जून रोजी रजा अकॅडमीच्या सदस्यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात शिष्टमंडळासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांची भेट घेतली होती. शर्मांवरील दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी केली असता नुपूर शर्मा यांना १३ जून रोजी भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स जारी करण्यात आले होते. त्याअनुषंगाने आज १३ जून रोजी नुपूर शर्मा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात हजर राहणार होती. परंतु शर्मा यांच्या वकिलांनी भिवंडी पोलीस प्रशासनाला चार आठवडे मुदतवाढीची मागणी केल्याची माहिती एसीपी वडके यांनी दिली आहे. मात्र नुपूर शर्मा यांना मुदत द्यायची का, याबद्दल पोलिसांनी अद्याप निर्णय घेतला नाही.
Nupur Sharma : नुपूर शर्माच्या वकिलांचा भिवंडी पोलिसांना ई-मेल; हजर राहण्यास मागितली मुद्दत - nupur sharma case
भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्यावर भिवंडीत गुन्हा दाखल करण्यात ( nupur sharma controversial statement ) आला. त्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी त्यांना १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावले होते. त्या अनुषंगाने आज (१३ जून रोजी) शर्मा यांना पोलीस ठाण्यात जबाबासाठी हजर राहावे लागणार होते. मात्र... ( Nupur Sharma )
नुपूर शर्माच्या वकिलांचा भिवंडी पोलिसांना ई-मेल