महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Jitendra Awhad Daughter Wedding : ना बँड बाजा.. ना बडेजाव.. जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह साध्या पद्धतीने संपन्न, पाहा फोटो - नताशा आव्हाड विवाह

बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (ncp minister jitendra awhad) यांच्या मुलीचा विवाहसोहळा (jitendra awhad daughter wedding) आज पार पडला आहे. नोंदणीकृत पद्धतीने हा विवाह सोहळा पडला.

jitendra awhad daughter marriage
jitendra awhad daughter marriage

By

Published : Dec 7, 2021, 5:45 PM IST

Updated : Dec 7, 2021, 9:42 PM IST

ठाणे - एकीकडे कोरोनाच्या नवीन व्हारसचे संकट कायम असताना राज्यभरात मोठ्या धुमधडाक्यात लग्न होत आहेत. त्यामध्ये करोडो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. असे असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह ठाण्यात साध्या पद्धतीने नोंदणी (jitendra awhad daughter wedding) पद्धतीने पार पडला. यासाठी मागील अनेक दिवसांपासून पारंपारिक विधी सुरू होते. काही दिवसांपूर्वी नकाशाच्या लग्नासाठी जागरण गोंधळ घालण्यात आले होते. आज लग्नाच्या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे भावूक झालेले पाहायला मिळाले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह ठाण्यात साध्या पद्धतीने

जितेंद्र आव्हाड यांना नताशा ही एकच कन्या आहे. उच्चशिक्षित असलेल्या नताशा हिचा प्रेमविवाह (natasha awhad register marriage) असून नताशा ही व्यावसायिक देखील आहे. जितेंद्र वडिलांची एकुलती एक कन्या असल्यामुळे ते लहानपणापासूनच त्यांची लाडकी होती. राजकारणामध्ये कुटुंबाला कमी वेळ द्यायला मिळाला, याची खंत यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली

आंतरधर्मीय विवाह संपन्न -
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आणि एलन पटेल यांचा विवाह विशेष मॅरेज अॅक्टनुसार रजिस्टर (natasha awhad register marriage) पद्धतीने संपन्न झाला. या वेळी जितेंद्र आव्हाड यांचे आणि पटेल यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
Last Updated : Dec 7, 2021, 9:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details