ठाणे - उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाई यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांनी उमेदवारी मागे घेण्यामागे मनसेला छुपा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू आहे.
मनसेच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची माघार; मुंब्र्यातही एमआयएमच्या उमेदवाराचे घुमजाव - राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाई यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांनी उमेदवारी मागे घेण्यामागे मनसेला छुपा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू आहे.
त्यामुळे आता ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात दुहेरी लढत दिसणार आहे. तर दुसरीकडे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार बरकत उल्लाह अली हसन शेख उर्फ गुंजन शेख यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने एमआयएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
तसेच कळवा-मुंब्रा मतदारसंघात सेनेचे उमेदवार दिपाली सय्यद आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये लढत असणार आहे. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी व ओवळा-माजिवडा मतदारसंघात कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने याठिकाणी मते फुटण्याचा धोका वाढला आहे.