ठाणे - सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षी २ कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, रोजगार देणे बाजूलाच राहिले आतापर्यंत ६.६० कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; शेकडो तरुणांनी बायोडाटा पाठवला मोदींना
गेल्या ५ वर्षात नोकरीसाठी एकही कॉल आला नसल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. तरुणांना रोजगार मिळाला नाही तर, देशात उद्रेक होईल आणि याला मोदी जबादार असतील, अशी टीका यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.
शेकडो तरुणांनी रोजगार मिळावा यासाठी आज ठाण्यातील दमाणी इस्टेट पोस्ट ऑफिस कार्यालयात आपला बायोडेटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवला. गेल्या ५ वर्षात नोकरीसाठी एकही कॉल आला नसल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तरुणांना रोजगार मिळाला नाही तर, देशात उद्रेक होईल आणि याला मोदी जबादार असतील, अशी टीका यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.