नवी मुंबई - अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीच्या माध्यमातून छापमारी केल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. यासंदर्भात माध्यमांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांना विचारलं असता 'करावे तसे भरावे', असा टोला राणे यांनी देशमुख यांना लगावला.
देशमुख यांच्या घरावर ईडीची छापेमारी राजकीय नाही..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने शुक्रवारी छापेमारी केली. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे देशमुख यांच्या अडचणी मात्र वाढताना दिसत आहेत. मात्र भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी ईडीची कारवाई ही राजकिय नसल्याचे म्हटले आहे.
करावे तसे भरावे..
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने केलेल्या छापेमारी विषयी 'करावे तसे भरावे' असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. 'देशमुखांनी करून झालं आत्ता भरायची वेळ आहे', त्यामुळे राष्ट्रवादीने यावर बोलू नये व राजकारण करू नये सद्यस्थितीत चौकशी सुरू आहे. जे खरं आहे ते लवकरच समोर येईल, असेही राणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले.
अनिल देशमुखांप्रकरणी नारायण राणेंसह इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया.. कर नाही तर डर कशाला- प्रविण दरेकर..
अनिल देशमुख या प्रकरणात दोषी नसतील तर त्यांना घाबरायची गरज नाही. यंत्रणा आपलं काम चोख बजावत आहेत, त्यामुळे हा विषय वाढवू नये. चौकशी अंती खरा प्रकार समोर येईलच, कर नाही तर डर कशाला असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
अनिल देशमुख यांनी ईडीला सहकार्य करावं..
ईडीची छापेमारी हा एक चौकशीचा भाग असून, अनिल देशमुख यांनी समोर येऊन खरा प्रकार सांगावा व ईडीला सहकार्य करावे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले.