ठाणेकाल सकाळपासूनच राज्यभरात हरिहरेश्वरमध्ये मिळालेल्या बोटीमुळे Suspected Boat In Raigad सर्व सरकारी सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या होत्या. तपासानंतर या बोटी भारताबाहेरून हरिहरेश्वरच्या किनाऱ्यांमध्ये Harihareshwar Incident आल्या असल्याचे उघड झाले. हा सर्व प्रकार होत असताना केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा हे सपशेल फेल State Government have Failed by Miserably Boat झाल्याचे दिसले आहे. असेच काही चित्र 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यावेळेसदेखील पाहायला मिळाले. मुंबईमध्ये 1993 साली झालेले बॉम्ब ब्लास्ट हे अशाच पद्धतीने झाले होते. या बॉम्ब ब्लास्टसाठी वापरण्यात आलेला आरडीएक्स हे ठाण्यातल्या नागलाबंदर येथून मुंबईमध्ये जाऊन शेकडो नागरिकांच्या जीवाचा बळी घेण्याचे कारण ठरले. मात्र, आजही नागला बंदर सुरक्षित नाही आणि यामुळेच पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्राचा सागरी किनारा आहे सुरक्षित नाही, हे दिसून येत आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा ठरल्या निष्कामी 1993 साली झालेल्या मुंबई ब्लास्टमुळे महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण देश हादरला होता. राज्य सरकारदेखील अस्थिर झाले होते आणि हे होण्याचे मुख्य ठिकाण होते. ठाण्यातील नागला बंदर हे होय. कारण इथे समुद्रमार्गे आलेले शेकडो किलो आरडीएक्स उतरवले गेले. जे मुंबईमध्ये पोहचून स्फोट झाल्याने शेकडो नागरिकांच्या बळीच कारण ठरले. रायगडची घटना तपासाधीन असतानाच नागला बंदरची अवस्था पाहिली असता एक गोष्ट समोर आली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा सागरी सुरक्षिततेच्या बाबतीत मोठी हलगर्जीपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. हे हल्ले रोखण्यासाठी खरेच जर प्रयत्न करायचे असतील, तर सागरी सुरक्षा ही गंभीरतेने घेऊन त्यावर उपाययोजनादेखील केल्या गेल्या पाहिजेत.
26 नोव्हेंबरच्या हल्ल्याची आठवण 26 नोव्हेंबरचा जो हल्ला झाला, हा सागरी मार्गाने येऊनच हल्ला झाला. ज्यामध्ये पुन्हा एकदा मुंबईमध्ये शेकडो नागरिकांचे बळी गेले. मुंबई हादरली, महाराष्ट्र हादरला आणि अख्खादेश मुंबईच्या घटनांभोवती केंद्रित झाला. या वेळेस राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले. सागरी सुरक्षा गंभीरतेने घेतले असल्याचे सांगितले. मात्र, आजही प्रत्यक्षात काहीही होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आजही सागरी सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजना या पुरेशा नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हरिहरेश्वरची घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह या एवढ्या छोट्या गोष्टीमुळे संपूर्ण देशाची सुरक्षा ही अडचणीत येऊ शकते. यामुळे या सर्व बाबी गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. 26 नोव्हेंबरचा हल्ला असो, वा 1993 सालचा बॉम्ब ब्लास्ट असो सागरी सुरक्षा, केंद्रीय यंत्रणा या कुठेतरी हलगर्जीपणा करीत होत्या आणि त्यामुळेच हे हल्ले झाले असल्याचे समोर आले आहे. आजही महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर दोन बोटी मिळाल्यावर जो प्रकार पाहायला मिळाला, यामध्ये हलगर्जीपणा दिसला आहे. त्यामुळे हा जर प्रकार रोखला, तर देशाला हल्ल्यापासून रोखायला मदत होईल. त्यासाठी सरकारी यंत्रणांना सतर्क आणि तैनात राहणे गरजेचे आहे.