ठाणे : शिवाजीनगर भिवंडी परिसरामध्ये प्रेम प्रकरणातून अल्पवयीनप्रेयसीची प्रियकराकडून धारदार शस्त्राने खूनकरण्यात आल्याची घटना शुक्रवार दिनांक 10 जून रोजी सायंकाळी घडली असून, प्रियकर आरोपीला देवनार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
प्रियकराकडून अल्पवयीन प्रेयसीची हत्या; आरोपीला पोलिसांकडून अटक
शिवाजीनगर भिवंडी परिसरामध्ये (In Shivajinagar Bhiwandi Area) प्रेम प्रकरणातून शुक्रवार दिनांक 10 जून रोजी अल्पवयीन प्रेयसीची सायंकाळी प्रियकराकडून धारदार शस्त्राने हत्या (Murder of a Minor Lover By a Lover) करण्यात आली होती. प्रियकर आरोपीला देवनार पोलिसांनी अटक केली (Arrested by Deonar police) आहे. गोवंडीच्या झाकीर हुसेन परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एकाशी प्रेम होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकमेकांपासून फारकत घेतली. त्यामुळे नैराश्य आलेल्या प्रियकराने शुक्रवारी सायंकाळी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून पळ काढला. आता आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Accused in police custody)
प्रियकराने नैराश्यातून प्रेयसीवर केला हल्ला : शिवाजीनगर गोवंडीच्या झाकीर हुसेन परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एकाशी प्रेम होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकमेकांपासून फारकत घेतली. त्यामुळे नैराश्य आलेल्या प्रियकराने शुक्रवारी सायंकाळी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून पळ काढला. देवनार पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेत जखमी प्रेयसीला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई चालू आहे.
पालघर येथेसुद्धा प्रियकराकडून प्रियसीची हत्या घडली होती : अत्यंत धक्कादायक बाब या घटनेत समोर आली होती. प्रियकराने प्रेयसीला मारून भिंतीत पुरून ठेवले होते. आणि त्याच घरात तो राहत होता. वाणगाव येथील वृंदावन दर्शन अपार्टमेंट इमारतीतील सदनिकेत भिंतीआड दडवून ठेवलेला एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमविवाहासाठी घरातून पळून गेलेल्या एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रियकरानेच प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह इमारतीच्या सदनिकेत भिंतीआड दडवून ठेवला होता. हत्येच्या आरोपाखाली तरुणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
हेही वाचा : Bride Sister Shot Dead : लग्नसमारंभात नवरीच्या बहिणीवर बंदुकीतून झाडल्या गोळ्या.. जागेवरच ठार..