महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण : मतदान केंद्रात चक्कर येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक; आयसीयूमध्ये उपचार सुरू - corporation

कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन पांडे यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. मात्र निवडणूक अधिकारी यांनी अद्यापही रुग्णालयात येऊन प्रकृतीची विचारपूस केली नसल्याची खंत पांडे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

अशोक धोंडू पांडे

By

Published : May 3, 2019, 12:13 PM IST

ठाणे - कल्याण लोकसभा निवडणुकीच्या एका मतदान केंद्रावर एक कर्मचारी चक्कर येऊन पडला होता. या घटनेची माहिती कुटुंबाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशोक धोंडू पांडे असे उपचार सुरु असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मतदान केंद्रात चक्कर येऊन पडलेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक

अशोक पांडे हे सफाई कामगार म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेत कार्यरत आहेत. कल्याण लोकसभेचे एका मतदान केंद्रावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. पांडे हे रविवारी दुपारच्या सुमारास कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील निळजे गावातील एका मतदान केंद्रावर निवडणुकाच्या कामासाठी आले होते. मतदान केंद्रावर पोहचल्यावर चक्कर येऊन ते खाली पडले. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान केंद्राच्या बाजूला बसवले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले.

कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन पांडे यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. मात्र निवडणूक अधिकारी यांनी अद्यापही रुग्णालयात येऊन प्रकृतीची विचारपूस केली नसल्याची खंत पांडे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. पांडे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी पालिका व निवडणूक आयोगाकडून मदत उपलब्ध करून देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details