ठाणे -वाईन शॉपमध्ये एका टोळक्याने दुकानातील कर्मचाऱ्यासोबत झालेल्या बाचाबाचीवरून कर्मचाऱ्यावर धारादार चाकूने वार केला आहे. या घटनेचे अद्याप नेमके कारण स्पष्ट झाले नसून हा सर्व प्रकार शनिवारी (१३ जुलै उल्हासनगरमधील मॉर्डन वाईन शॉप येथे घडला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Video : उल्हासनगरात वाईन शॉपमधील कामगारावर प्राणघातक हल्ला - crime
वाईन शॉप मालकाने उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आता पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे वार करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गुन्ह्यामध्ये अजुन एका गुन्ह्याची भर पडली आहे. उल्हासनगरमधील घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उल्हासनगरमधील मॉडर्न वाईन शॉपमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी तरुणांचा समुह दारू विकत घेण्यासाठी आला. मात्र, देवाण-घेवाणीच्यावेळी कर्मचारी आणि एका तरुणाचा वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हिंसेत झाले आणि त्या तरुणाने कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार चाकूने वार केला. यात कर्मचारी जखमी अवस्थेत पडला. पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वाईन शॉप मालकाने उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता पोलीस या सीसीटीव्हीच्या आधारे वार करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.