ठाणे - फळ विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. मनसेने आज महामोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चाला गावदेवी मैदानातून सुरुवात झाली आहे.
फळ विक्रेत्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ मनसेचा महामोर्चा; मोर्चाला गावदेवी मैदानातून सुरुवात - मनसे
फळविक्रेत्यांवरील कारवाईनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. मनसेने या कारवाईचा निषेध करत आज महामोर्चाचे आयोजन केले आहे.
महामोर्चा
महापालिका प्रशासनाने फळ विक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्याच्या निषेधार्थ मनसेने महामोर्चाचे आयोजन केल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. या मोर्चात राज्यभरातील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली आहे. या मोर्चाला गावदेवी मैदानातून सुरुवात झाली असून मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून जात आहे.