महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray Sabha Thane : येत्या 9 एप्रिलला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार! - राज ठाकरे ठाणे सभा

महानगरपालिका निवडणुक पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या 9 एप्रिल जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत टीका केली होती. विशेष: मशिदीवरील भोंगे प्रकरणावर राज ठाकरेंनी केलेले त्या विधानावरुन राजकीय वर्तृळात विविद तर्क वितर्क लावले जात आहे. शिवाय ठाकरे यांच्या विधानानंतर अनेकांनी त्यांच्या टीकाही केली.

राज ठाकरे संग्रहित छायाचित्र
राज ठाकरे संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 5, 2022, 4:54 PM IST

ठाणे -महानगरपालिका निवडणुक पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या 9 एप्रिल जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत टीका केली होती. विशेष: मशिदीवरील भोंगे प्रकरणावर राज ठाकरेंनी केलेले त्या विधानावरुन राजकीय वर्तृळात विविद तर्क वितर्क लावले जात आहे. शिवाय ठाकरे यांच्या विधानानंतर अनेकांनी त्यांच्या टीकाही केली. या टीकांना राज ठाकरे आपल्या सभेतून काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. यापूर्वी ठाण्यात अनेकदा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. यात नवीन नियुक्ती आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details