महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे-भाजपचा ठाण्यात राडा, 50 कार्यकर्ते ताब्यात - THANE

मागील काही दिवसांपासून "ठाण्यात बदललेल्या राजकारणामुळे भाजपने या शेतकऱ्यांचा स्टॉल पालिका अधिकाऱ्यांना काढायला लावले आणि त्यातून हा वाद पेटला आहे. नौपाडा पोलिसानी दोन्ही बाजूच्या 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहेत.

मनसे भाजप राडा

By

Published : May 9, 2019, 11:44 PM IST

Updated : May 10, 2019, 12:31 AM IST


ठाणे - भाजप आणि मनसेचे निवडणुकीतील युध्द पुन्हा पेटलेले दिसत आहे. त्यातूनच कामोठे नंतर ठाण्यात भाजपचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. फूटपाथवर आंब्याच्या लावण्यात येणाऱ्या स्टॉल वरून वादावादी झाली. यामध्ये भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. पोलिसांनी केला लाठीचार्ज दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंगावले.

मनसे - भाजपचा ठाण्यात फुल्ल राडा

मनसेचे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी स्टॉल्स असतात, भाजपचा आंबा महोत्सव असतो. पण मागील काही दिवसांपासून बदललेल्या राजकारणामुळे भाजपने या शेतकऱ्यांचा स्टॉल पालिका अधिकाऱ्यांना काढायला लावले आणि त्यातून हा वाद पेटला आहे. नौपाडा पोलिसानी दोन्ही बाजूच्या 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

ठाण्यातील विष्णु नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे, त्या बाजूलाच फुटपाथवर आंबे विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे, शेतकरी ते थेट ग्राहक सुविधेचा हा स्टॉल उभारण्यात आला होता. मात्र हा स्टॉल फुटपाथवर असल्याने भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी त्याला विरोध केला, दरम्यान मराठी माणसाचे हे स्टॉल असल्याने हा स्टॉल हटवू नका अशी भूमिका मनसेने घेतली. यामुळे भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने आले. एवढंच नव्हे तर एकमेकांनी चक्क पक्षश्रेष्ठीवर जोरदार शिव्या सुरू केल्या. दरम्यान यावेळी पोलिसांनी शांत राहण्याचे आवाहन करूनदेखील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जुमानले नाही.

दरम्यान यामध्ये नौपाडा पोलिसांनी भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यावर जबर लाठीचार्ज करण्यात आला. सदर घटनेत पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगापांग केली. यावेळी भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी तसेच त्याच्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला. पोलिसानी या वेळी सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला आणि भाजप मनसेच्या 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Last Updated : May 10, 2019, 12:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details