महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अल्पवयीन मुलीवर घरात शिरून अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

निजामपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वस्तीत एका अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

minor girl Physical abuse in Nizampura at Thane
ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By

Published : Jan 1, 2020, 8:47 PM IST

ठाणे - शहरातील निजामपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वस्तीत एका अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. हा व्यक्ती वस्तीत त्याच्या नातेवाईकांच्या घरी ये-जा करत असे, त्याने त्याच वस्तीत शेजारी राहणाऱ्या मुलीच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: महामार्गावर चालणारे मातीचे टिप्पर तत्काळ बंद

शाहनवाज अन्सारी (२२ रा. खाडीपार) असे या आरोपीचे नाव आहे. निजामपुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई करत या नराधमाला काही तासातच बेड्या ठोकल्या.

हेही वाचा... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अर्थमंत्री जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वस्तीत पीडित अल्पवयीन मुलगी कुटूंबासह राहते. त्याच वस्तीत पीडितेच्या एका नातेवाईकांच्या घरी आरोपी शाहनवाज ये-जा करीत असे. त्यामुळे शेजारी राहत असल्याने पीडितेची त्याच्या सोबत ओळख झाली. याच ओळखीचा फायदा घेत तो ३० डिंसेबर रोजी पीडितेच्या घरात आला. त्यावेळी पीडितेची आई कामानिमित्ताने घराबाहेर गेली होती. तर पीडितेसोबत तिचे लहान बहीण -भाऊ घरात होते. त्यांना पाहून आरोपीने पीडितेच्या लहान भावांना खाऊच्या बहाण्याने पैसे देऊन घराबाहरे पाठवले आणि पीडितेवर घरातच बळजबरीने अत्याचार करून तो पळून गेला.

हेही वाचा... विनाअनुदानित गॅस सिलिंडर १९ रुपयाने महाग

दरम्यान, पीडितेची आई कामावरून घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच तिच्या आईला धक्काच बसला. तिने पीडित मुलीला घेऊन निजामपूर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व घटना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी शाहनवाजवर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला. काही तासातच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता ६ जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details