ठाणे - भिसीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका २८ वर्षीय तरूणाच्या गुप्तांगावर धारदार चाकुने सपासप वारकरून गंभीर जखमी केल्याचीघटना समोर आली आहे.ही घटनाअंबरनाथ शहरातील बुआपाडा परिसरात घडली आहे.परशुराम असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर हुसैनी असे हल्लेखोरराचे नाव असून तो फरार झाला आहे.
धक्कादायक ! भिसीच्या पैश्याच्या वादातून तरुणाच्या गुप्तांगावर चाकुने वार - वाद
अंबरनाथ शहरातील बुआपाडा परिसरात परशुराम हा झाडू विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच परिसरात आरोपी हुसैनी राहत असल्याने दोघांची आधीपासून ओळख असल्याने त्यांनी भिसी लावली होती.
भिसीचे पैसे मागण्याकरीता परशुराम हा आरोपी हुसैनी याच्याकडे गेला होता. त्यावेळी परशुरामने भिसीच्या पैशांची मागणी केली असता ते पैसे देण्यास हुसैनीने नकार दिल्याने त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्याच वादातून आरोपी हुसैनी याने परशुरामला शिवीगाळी करीत ठोशाबुक्कयाने मारहाण करीत असतानाच त्याची पॅन्ट पकडून त्याच्या गुप्तांगावर धारदार चाकुने सपासप वारकरून त्याला जखमी केले.
गंभीर जखमी अवस्थेत परशुरामला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात हुसैनी याच्याविरोधात विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपी हुसैनीचा सर्वत्र शोध घेत आहेत. अधिक तपास ए. एस. आय. चव्हाण करीत आहेत.