ठाणे -कोरोना आणि ओमायक्रॉनमुळे देशातील सर्वच उद्योगधंद्यांवर आर्थिक संकट आले आहे. दोन दिवसांवर मकर संक्रांत ( Makar Sankranti ) हा सण आहे आणि संक्रांत म्हटल की तिळगुळ आणि आकाशात विहरणाऱ्या रंगबेरंगी पतंग ( Kite Business in Trouble ) डोळ्यासमोर येतात. मात्रा, कोरोनामुळे या व्यवसायालाही फटका बसल्याने आता या व्यवसायात उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना इतर पर्यायी व्यवसाय अवलंबून रहावे लागत आहे.
अब्दुल मेमन हे मागील 45 वर्षांपासून ठाण्यात पतंग व मांजा विक्रीचा व्यवसाय करतात. मेमन यांच्याकडे मकरसंक्रांत निमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या पतंगीपासून मोठ्या पतंग तसेच रंगीबेरंगी व विविध प्रकारचे मांजे विक्रीसाठी आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेली टाळेबंदी त्यानंतरचा अवकाळी पावसाचा मोठा फटका या व्यवसायावर झाल्याने यंदा कमी प्रमाणात पतंगी विक्रीसाठी बाजारपेठेत आल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविणाऱ्यांची संख्या कोरोनामुळे कमी झाली आहे. यामुळे पतंग विक्रीवर याचा प्रचंड परिणाम झाला असल्याचे दुःख पतंग विक्रेते मेमन व्यक्त करत आहेत.