ठाणे - अबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन रेल्वे ट्रॅकवर २७ जानेवारी रोजी पहाटे रेल्वे रुळांची दुरुस्ती करीत असताना अंगावर सिमेंट स्लिपर पडून एका कामगाराचा मृत्यू तर दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात एटीआरटी मशिनच्या ऑपरेटरला निष्काळीज करून अपघातात केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ऑपरेटरला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
सुनिल कुमार उर्फ सोनु सिंग असे अटक केलेल्या मशीन ऑपरेटरचे नाव असून त्याच्यावर बेजबाबदार व निष्काळजीपणे त्याच्या ताब्यातील गैन्ट्री वेगाने चालविल्याने बीआरएनचा स्टॉपर निघून डिरेल होवुन ती इजिनच्या लोंगहॅन्डवर जावुन आदळल्याने त्या ठिकाणी उभे राहुन सिमेंट स्लिपर ठेवण्याचे काम करीत असलेल्या कामगारपैकी गणेश किसन सिद, (वय 20 रा. कारेगाव, जि.पालघर ), वासूदेव भावडो सिद, (वय 26,रा. .कारेगाव, जि. पालघर ) हे गंभीर जखमी झाले होते. तर राजु सनू अगरे, (वय 36, वर्षे, कारेगाव,जि. पालघर ) हा कामगार रेल्वे इंजिन व गॅन्ट्री गिअर बॉक्स मध्ये दबुन त्याचा त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मशीन ऑपरेटरला जबाबदार धरून बाबत त्याच्या विरोधात भा.दं.वि. 304(अ), 337, 338 अन्वये कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अटक आरोपी सुनील कुमार उर्फ सोनू सिंग याला आज कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.