महाराष्ट्र

maharashtra

कल्याण-शिळ मार्गावर पुन्हा मोठी जलवाहिनी फुटली, रस्त्याला नदीचे स्वरूप

By

Published : May 28, 2021, 9:02 PM IST

कल्याण-शिळ मार्गावर पुन्हा एकदा पाइपलाइन फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले. कटाई गावांच्या हद्दीत ही भलीमोठी जलवाहिनी अचानक आज सायंकाळच्या सुमारास फुटली. त्यामूळे कल्याण-शिळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

रस्त्याला आले नदीचे स्वरूप
रस्त्याला आले नदीचे स्वरूप

ठाणे -कल्याण-शिळ मार्गावर पुन्हा एकदा पाइपलाइन फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले. कटाई गावांच्या हद्दीत ही भलीमोठी जलवाहिनी अचानक आज सायंकाळच्या सुमारास फुटली. त्यामुळे कल्याण-शिळ मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. कल्याण-शिळफाटा येथून ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.

कल्याण-शिळ मार्गावर पुन्हा मोठी जलवाहिनी फुटली, रस्त्याला नदीचे स्वरूप

पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन
कल्याण-शीळ मार्गावरील कटाई येथे मेन लाइनवर ब्रेकडाऊन झाल्यामुळे पंपिग बंद करण्यात आले. त्यामुळे डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 1, फेज 2 आणि निवासी विभाग, तसेच सर्व ग्रामपंचायत भागांना दुसरीकडून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची एमआयडीसीच्या पाणी विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे रहिवाशांनी पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जानेवारी महिन्यातही झाली अशी घटना

विशेष म्हणजे जानेवारी महिन्यातही अशाच प्रकारे पाइपलाइन फुटून संपूर्ण रस्त्यावर पाणी आले होते. यावेळीही लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कल्याण-शिळ रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मनसेचे ट्रॅफिक वॉर्डन मदत करत होते.

हेही वाचा -Maratha reservation - संभाजी राजे शिवराज्याभिषेकदिनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार

ABOUT THE AUTHOR

...view details