महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कसारा घाटातील कारच्या अपघातात आमदार कुटुंब थोडक्यात बचावले - विधानसभा

अपघातात आमदार व त्यांचे कुटुंब जखमी झाल्याची अफवा असून त्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, अशी प्रतिक्रीया आमदार पांडुरंग बरोरा दिली आहे.

आमदार पांडुरंग बरोरा यांच्या कारला अपघात

By

Published : Apr 1, 2019, 9:12 AM IST

ठाणे - शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या कारला मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात अपघात झाला. अपघातात बरोरा कुटुंब बचावले आहे. मात्र, सोशल मीडियावरुन तालुक्यात अपघात झाल्याची बातमी पसरताच एकच खळबळ उडाली.

शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या कारला मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात अपघात

शहापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांच्या कारने त्यांच्या पत्नी प्रियांकाताई बरोरा, सासू आणि सासरे एका लग्न सोहळ्यासाठी माळगावी जाताना ओहलाचीवाडी (लतीफवाडी) येथे सायंकाळी ४ च्या दरम्यान हा अपघात झाला. यावेळी आमदार बरोरा हे पक्षाच्या कामानिमित्त शहापूरमध्येच असल्याने ते अपघातावेळी कारमध्ये नव्हते.

दरम्यान, आमदार पांडुरंग बरोरा यांनी काही वेळातच सोशल मीडियावर आपण व आपले कुटुंब सुखरूप असल्याची पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे अपघातात आमदार व त्यांचे कुटुंब जखमी झाल्याची अफवा असून त्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, अशी प्रतिक्रीया आमदार पांडुरंग बरोरा यांनी पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details