महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ए लंबू म्हटले म्हणून भिवंडीत भररस्त्यात मित्राची चाकुने भोसकून हत्या - thane crime news in marathi

ही घटना भिवंडीतील नुरीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. समीर शेख (वय, २१ रा. आजाद नगर, भिवंडी) या मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मित्राची हत्या
मित्राची हत्या

By

Published : Aug 10, 2021, 6:55 PM IST

ठाणे - मित्रांमध्ये मस्करी सुरू असतानाच 'ए लंबू' म्हणणे एका मित्राच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लंबू म्हणताच आरोपी मित्राने चाकूने भोसकून भर रस्त्यातच मित्राची हत्या केली. ही घटना भिवंडीतील नुरीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. समीर शेख (वय, २१ रा. आजाद नगर, भिवंडी) या मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर मोहम्मद अजगर मो. शेख उर्फ सन्नाटा (वय २०, नुरीनगर, भिवंडी) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे.

जमावाचा आरोपीवरही हल्ला

मृत मोहम्मद अजगर हा कुटूंबासह भिवंडीतील नुरीनगर परिसरात राहतो. काही दिवसापूर्वी मृतक व आरोपी समीरमध्ये काही कारणावरून वाद होऊन भांडण झाले होते. त्यातच काल रात्रीच्या सुमारास मृत मोहम्मद असगर याने आरोपी समीरला ये लंबू म्हणून जोराने आवाज दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन झटापटी झाली. त्यावेळी आरोपीसह त्याच्या साथीदारांनी भर रस्त्यातच मृत मोहम्मद अजगरला मारहाण करीत त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. ही घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत आरोपी समीरही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र घटनेचे गांभीर्य पाहता परिससरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी नितीन पाटील करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details