महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हिम्मत असेल तर आडवा येऊन दाखव, जितेंद्र आव्हाडांचे पडाळकरांना आव्हान

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांचा जोरदार समाचार घेतला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

By

Published : Feb 12, 2021, 7:06 PM IST

Updated : Feb 12, 2021, 7:45 PM IST

ठाणे -जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नियोजित वेळेच्या आधीच अनावरण केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली. दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांचा जोरदार समाचार घेतला आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

औपचारिक कार्यक्रमाच्या आधीच अनावरण-

’पवार साहेब उद्या जेजुरीला येत आहेत. हिम्मत असेल तर आडवा येऊन दाखव,’ असं आव्हान आव्हाड यांनी पडळकरांना दिलं आहे. जेजुरी गडावरील पायरी मार्गावर जेजुरी संस्थानच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते उद्या दुपारी होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच आज पहाटे पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी जेजुरीत जाऊन पुतळ्याचं अनावरण केलं. औपचारिक कार्यक्रमाच्या आधीच हे अनावरण करण्याचं कारण सांगताना पडळकर यांनी पवारांवर टीका केली. यावरुन आव्हाड यांनी पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला.

ही संस्कृती त्या माऊलींची नव्हे-

आज पहाटे लपून छपून चोर दरवाजाने आत जात चोरासारखे गोपीचंद पडाळकर यांनी ज्या माऊलीने स्वकष्टाने संपूर्ण भारतात आपले नाव कोरले. तिच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. अखंड भारतामध्ये सर्वाधिक देवळांचा जिर्णोद्धार कोणी केला असेल तर तो या माऊलीने केला. जी माऊली कधीच कुठल्याही राजवटीला घाबरली नाही आणि स्वत:च्या माध्यमातून एक संस्कारक्षम रयत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. ज्या पद्धतीने गोपीचंद पडाळकर हे शरद पवारांवर बोलले. ही संस्कृती त्या माऊलींची नव्हे. कुठल्याही दुसर्‍या धर्माचा या माऊलीने उपमर्द केला आहे, असे कुठेही दिसलेले नाही. मला वाटते, गोपीचंद पडळकर यांना एक कला उमगलेली दिसते. शरद पवारांवर टीका केली तर सकाळची हेडलाईन तुमच्या नावावर असते. अरे हिम्मंत होती तर अनावरण दुपारी करायचे, सांगून करायचे, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांना दिले आहे.

आडवे येऊन दाखवा-

"उद्या शरद पवार जाणार आहेत. हिम्मत असेल तर आडवा येऊन दाखव, परत उभा राहशील की नाही शंका आहे! अन् येऊ नकोस, तुझ्या भल्यासाठी सांगतोय, अरे तुरेची भाषा ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. ज्या माऊलीने या महाराष्ट्राला दिलेली नाही. त्या माऊलीचे नाव घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करु नका", असेही आव्हाड यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-अर्थसंकल्पावर विरोधकांकडून चुकीचे कथन - केंद्रीय अर्थमंत्र्यांची राज्यसभेत टीका

Last Updated : Feb 12, 2021, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details