ठाणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा आयोध्येला जाणार असल्याने सध्या राजकीय वातावरणात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या दौऱ्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांना निमंत्रण असल्याची बातमी समोर येताच सरकावर टीका होऊ लागली. यामुळे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नेते संभ्रमात असल्याचे चित्र आहे. या प्रकरणावर गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मत व्यक्त केले आहे.
श्री राम हे कोणाच्या मालकीचे नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लहानपणापासून प्रभू श्रीरामाची भजने ऐकूनच मोठा झालो आहे, असे ते म्हणाले.