ठाणे -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लक्षणे आढळ्याने त्यांनी स्वत: ला होम क्वारंटाईन केले होते. मात्र यानंतर त्यांला ताप आला; आणि फोर्टीस रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. आव्हाड सध्या उपचार घेत आहेत. मात्र, यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळेच एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्याने आव्हाडांना एकलव्याची उपमा दिलीय. तसेच जितेंद्र आव्हाड आम्हाला नाराज करत असल्याचे तो म्हणालाय. या पत्रात आव्हाडांच्या समर्थकाने कार्यकर्त्यांतर्फे भावनिक आवाहन केले आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याचे शरद पवार यांना तक्रारीचे पत्र
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळेच एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्याने आव्हाडांना एकलव्याची उपमा दिलीय.
आव्हाडांची एक तक्रार त्याने शरद पवारांकडे केली आहे. आव्हाड कायम कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जातात. मात्र, आता ते फोन उचलत नाहीत, असा उल्लेख त्याने केलाय. आव्हाड कार्यकर्त्यांवर नाराज असल्यास त्यांनी शिवीगाळ करावी, मात्र फक्त फोन उचलावा, असे आवाहन या कार्यकर्त्याने केले आहे.
आव्हाड सध्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत आहेत. यामुळे ते कार्यकर्त्यांच्या संपर्कात नसल्याची चर्चा आहे. मात्र, नेत्याच्या प्रेमापोटी या कार्यकर्त्याने पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.