नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC Market ) आज १०० किलोप्रमाणे वाटण्याचे दर हजार ते दोन हजार रुपयांनी कमी झाले आहे. शंभर किलो प्रमाणे पडवळच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात ( Ghewada Prices Increases ) हजार रुपयांनी वाढ झाली. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला ( Other Vegetables Stable ) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ४००० ते ५००० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४००० ते ५००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७००० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे ५५०० ते ६००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ३८०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ७००० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे ६००० ते ७००० रुपये, कैरी प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २००० ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये
फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : कारली प्रति १०० किलोप्रमाणे ४५०० ते ५००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे
२००० ते २४०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे ४३०० ते ५००० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ४००० ते ४५०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ४६०० ते ५४०० रुपये,