महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 3, 2022, 10:08 AM IST

ETV Bharat / city

VIDEO : थरारक.. ठाण्यात उड्डाणपुलालगतच्या वायर्सना आग, वाहनांवर ठिणग्यांचा वर्षाव

भिवंडीतील स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर संरक्षक कठड्याच्या खालील बाजूकडून विद्युत पुरवठा करणाऱ्या अनेक वायर्सना अचानक आग लागली. दुसरीकडे आगीच्या मोठ मोठ्या ठिणग्या खाली जाणाऱ्या अनेक वाहनांवर पडत होत्या. त्यामुळे, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहवयास मिळाले.

wires near flyover caught fire in thane
वायर आग ठाणे

ठाणे - भिवंडीतील स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर संरक्षक कठड्याच्या खालील बाजूकडून विद्युत पुरवठा करणाऱ्या अनेक वायर्सना अचानक आग लागली. दुसरीकडे आगीच्या मोठ मोठ्या ठिणग्या खाली जाणाऱ्या अनेक वाहनांवर पडत होत्या. त्यामुळे, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहवयास मिळाले. खळबळजनक बाब म्हणजे, आगीच्या ठिणग्या खाली पडत असतानाच गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक त्या ठिकाणाहून रवाना झाला. जर गॅसने पेट घेतला असता तर मोठी मुनष्यहानी झाली असती. मात्र, सुदैवाने पाऊस आला आणि मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

आगीच्या ठिणग्या वाहनांवर पडत असल्याचे दृश्य

हेही वाचा -Ulhas River : उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर मासेमारीसाठी नागरिकांची झुंबड

आगीच्या ठिणग्या वाहनांवर -भिवंडी महापालिका व तत्कालीन राज्य सरकराने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून स्व.राजीव गांधी उड्डाणपूल बांधला. मात्र, हा उड्डाणपूल कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडत आला. असे असताना अनेक विद्युत वायर्स आनंद दिघे चौक परिसरात असलेल्या स्व.राजीव गांधी उड्डाणपुलावर संरक्षक कठड्याच्या खालील बाजूकडून गेल्या आहेत. याच विद्युत वायर्सना भर पावसात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत विद्युत वायर जळत असताना या उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू होती. त्यामुळे, आगीच्या ठिणग्या अनेक वाहनांवर पडत होत्या. साहजिकच एखाद्या वाहनाने पेट घेऊन आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असता. मात्र, पाऊस पडत असल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना या ठिकाणी घडली नाही. खळबळजनक बाब म्हणजे, आग लागलेली असताना त्याखालील मार्गावर सीएनजी गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक त्या ठिकाणाहून रवाना झाला होता.

जबाबदार कोण? नागरिकांकडून सवाल - दरम्यान यावेळी उड्डाणपुलाखालून पेट्रोल-डिझेलने भरलेला टँकरही जात होता. त्यावेळेस एखाद्या टॅंकरवर आगीच्या ठिणग्या पडून मोठी जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. तर, या घटनेबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी पांडुरे गुर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आगीची कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तसेच, आगीच्या घटनेत जळालेली केबल वायर भिवंडी महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. मात्र, या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दुसरीकडे या घटनेच्या चौकशीची मागणी आता परिसरातील नागरिक करताना दिसत आहेत.

हेही वाचा -CM Eknath Shinde Residence Security : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी Z सुरक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details