ठाणे -शुक्रवारी ठाणेकरांनी साश्रू नयनांनी आज दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. यंदाचो कोरोनाचे संकट टळू दे अशीच मनोकामना त्यांनी देवाकडे केली. या दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विसर्जन घाट ,कृत्रिम तलाव स्वीकृत केंद्र अशी जय्यत तयारी करण्यात आली होती.
ठाण्यात साश्रू नयनांनी दिला दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप - ganesh chaturthi
यावर्षी गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या 40 केंद्रांवर विसर्जन करण्यात आले. यात ७ घाट, १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्र यांचा समावेश आहे. यात अनेक नागरिकांनी डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधेचाही लाभ घेतला.
यावर्षी गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या 40 केंद्रांवर विसर्जन करण्यात आले. यात ७ घाट, १३ कृत्रिम तलाव आणि २० स्वीकृती केंद्र यांचा समावेश आहे. यात अनेक नागरिकांनी डिजीठाणे प्रणालीद्वारे मूर्ती विसर्जन करण्यासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंग सुविधेचाही लाभ घेतला. याचबरोबर विसर्जनाला येणाऱ्या भाविकांची अँन्टीजन चाचणीही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात आले होते. त्यामुळे पाच ते दहा दिवसांसाठी 50 हजार अँन्टीजन किट तयार ठेवण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी cctv असतील या पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे..
हेही वाचा -संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून फसवणूक; मनोहरमामाला पाच दिवसाची पोलीस कोठडी