ठाणे - शांतीनगर परिसरातील मोमीनपुरा येथे असलेल्या चार मजली अनधिकृत इमारतीच्या खांबांना तडे गेल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासनाने संबंधित इमारत तत्काळ रिकामी केली असल्याने यामध्ये राहणाऱ्या 45 कुटुंबातील 300 नागरिकांना नवीन छत शोधण्याची वेळ आली आहे.
सुमारे 15 वर्षांपूर्वी अय्याज मंजिल या नावाने ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. मंगळवारी(दि.२७ ऑगस्ट)ला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या तळमजल्यावरील एका खांबाचे प्लास्टर पडू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख ईश्वर आडेप यांना मिळताच ते पथकासह शांतीनगर पोलिसांनासह घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील सर्व नागरिकांना बाहेर काढून इमारत निर्मनुष्य केली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर सकाळी तज्ञ-अभियंते जावेद यांना इमारतीची पाहणी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर त्यांनी इमारतीचे नमुने घेऊन पुनर्लेखन अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा : भिवंडीत चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी