ठाणे : ठाणे वाहतूक शाखेच्यावतीने ( Thane Police Traffic Branch ) शुक्रवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन ( Traffic Rules Breach In Thane ) केलेल्या वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आलेे. हा अनोखा उपक्रम करताना पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांना जनजागृतीचे पोस्टर 15 मिनिटे ( Traffic Rules Awareness ) पकडा, अन्यथा दंड भरा ( Fine For Traffic Rule Breach ) असा अनोखा पवित्रा घेतला होता. शुक्रवारच्या समुपदेशन मोहिमेत तब्बल १ हजार ४३६ वाहन चालकांचे सामऊपदेशन करत वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी केली.
समुपदेशनाची विशेष मोहीम :ठाण्यात रोड अपघातात वाढ झालेली असून, अपघातात मृत्यूचा आकडाही वाढला आहे. याला आळा घालण्यासाठी वाहनचालकांच्या समुपदेशनाची विशेष मोहीम शुक्रवारी ठाणे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी राबविली. या मोहिमेत तब्बल दीड हजाराच्या आसपास वाहनचालकांचे समुपदेशन करून सिंग्नल जम्पिंग, हेल्मेट वापर, सीटबेल्ट वापराबाबत फायदे आणि सुरक्षा याबाबत समुपदेशन करण्यात आले. ठाणे वाहतूक शाखेने समुपदेशन केलेल्या वाहनचालकांची संख्या १ हजार ४३६ एवढी आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १८ ठिकाणी शुक्रवारी समुपदेशनाची विशेष मोहीम राबविण्यात आली.