ठाणे :दसरा मेळाव्याच्या ( Dussehra Melawa ) दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला होता. हा खुलासा होता धर्मवीर आनंद दिघे ( Dharmaveer Anand Dighe ) यांच्या मालमत्तेबाबत होता. सर्वसामान्य घरातला एक कार्यकर्ता ज्याने आपल्या कामाने स्वतःची ओळख निर्माण केली काम करताना लाखो लोकांची संबंध निर्माण झाले आणि एक नेता तयार झाला अशा प्रकारची ओळख असलेल्या आनंद दिघे यांची मालमत्ता किती ( How much property of Anand Dighe? ) होती, हा एक दसरा मेळाव्यानंतर चर्चेचा विषय होता. प्रत्यक्षात त्यांची मालमत्ता किती होती याचा आढावा घेतला असता त्यांनी वडिलोपार्जित घरा व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता काहीच नसल्याचे समोर आले आहे.
आनंद दिघे यांची मालमत्ता किती?दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या मालमत्तेविषयी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी चौकशी केल्याची सांगितले आणि मग लोकांच्या मनामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची मालमत्ता किती होती हा प्रश्न उभा राहिला. या प्रश्नाचे उत्तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका त्यांच्या मित्राने दिले आहे. हे उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल कारण खिशात एकही रुपया नसलेला हा माणूस महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ वलय कसा निर्माण करू शकला तर त्याचे उत्तर हे त्यांनी कमावलेली मालमत्ता नसून त्यांनी कमावलेले लोक कार्यकर्ते आणि संबंध हे होते. वडिलोपार्जित घर हे देखील बहिणीच्या ताब्यात आहे. त्यांचे कार्यालय असलेला आनंदाश्रम आजही कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्याकडे असलेल्या सोनं नाणं हे देखील आजही आनंद मठामध्ये पाहायला मिळते. त्यांची असलेली वाहन ही लोकांनी दिलेल्या मदतीतून निर्माण झाली होती.
लोकांनी घडवलेला नेता - अगदी युवक अवस्थेपासून नागरिकांच्या मदतीसाठी धावणारा एक युवक सर्वसामान्य घरातून शिवसेनेच्या नेत्या पदापर्यंत पोहोचला ज्याला बाळासाहेब यांनी पहिली गाडी दिली आणि ती जुनी झाल्याने भारतीय कामगार सेनेने दुसरी गाडी दिली. असे ते आनंद दिघे आजही महाराष्ट्रामध्ये लोकांच्या आठवणीत आहेत.