ठाणे - शिळफाटा येथील वेताळ पाडा, देसाई गावाजवळ एक घर कोसळले आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे त्यांचे नाव सपना विनोद पाटील असे आहे. दिवा येथील देसाई गावात वेताळ पाड्यात मोठे अग्निकांड झाले. या अग्निकांडात एक घर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत मालकीण सपना विनोद पाटील (40) यांचे निधन झाले. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
ठाण्यात अग्निकांड, घर कोसळून महिलेचा मृत्यू - ठाण्यात घर कोसळून महिलेचा मृत्यू
शिळफाटा येथील वेताळ पाडा, देसाई गावाजवळ एक घर कोसळले आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांचे नाव सपना विनोद पाटील असे आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आरडीएमसी, टीडीआरएफ, पोलीस हे घटनास्थळावर दाखल झाले होते. त्यांनी बचावकार्य करून तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. घर कोसळ्याने ठिगाऱ्याखाली दबून सपना पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह हा बाहेर काढण्यात आला आहे. त्याला डायघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अद्याप आग कोणत्या कारणाने लागली होती. याची माहिती मिळालेली नाही, असे ठाणे महापालिकेच्या व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.
हेही वाचा -नवाब मलिकांचे आरोप बेछूट, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील - भाजप नेते चंद्रकांत पाटील