महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डॉ. दाभोलकरांच्या विवेकाचा आवाज बुलंद करूया; ठाण्यातील निर्भयी फेरीमध्ये निर्धार - धर्मांध शक्ती

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला मंगळवारी सहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, या सहा वर्षांमध्ये पोलिसांना त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करता आली नाही. तसेच या खुनामागे कोणत्या धर्मांध शक्ती आहेत, याचा सुगावा देखील महाराष्ट्र पोलिसांना अद्याप लागलेला नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मंगळवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

ठाण्यातील निर्भयी फेरीमध्ये निर्धार

By

Published : Aug 20, 2019, 9:03 PM IST

ठाणे- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मंगळवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शहरामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही प्रभात फेरी तलाव पाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी आली. त्यानंतर फेरीचे रुपांतर सभेत झाले.

ठाण्यातील निर्भयी फेरीमध्ये निर्धार

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला मंगळवारी सहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, या सहा वर्षांमध्ये पोलिसांना त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करता आली नाही. तसेच या खुनामागे कोणत्या धर्मांध शक्ती आहेत, याचा सुगावा देखील महाराष्ट्र पोलिसांना अद्याप लागलेला नाही. त्यामुळे ही चिंताजनक बाब आहे. राज्यभरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले. विवेकाचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी ठाण्यामधील या प्रभात फेरीला जमलेल्या विविध क्षेत्रातील नामवंत कार्यकर्ते आणि नागरिकांच्या खांद्यावर आहे, याची आठवण अविनाश पाटील यांनी करून दिली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे देव किंवा धर्माच्या विरोधात नव्हते. तर धर्माच्या नावाखाली किंवा देवाच्या नावावर ज्या अंधश्रद्धांचा बाजार केला जातो, ज्या अंधश्रद्धांच्या आधारे समाजातील अज्ञानी आणि भोळ्या लोकांना फसविले जाते, नागविले जाते त्या अंधश्रद्धांच्या विरोधात त्यांनी लढा उभारला होता. त्यातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली. या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन राबवला जावा, विवेकी विचारांचा जागर व्हावा यासाठी आयुष्यभर धर्मांध शक्तींशी त्यांनी लढा दिला. याच धर्मांध व्यक्तींनी त्यांचा आवाज बंद व्हावा म्हणून 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांचा खून केला. विचारांचा मुकाबला विचारांनी केला गेला पाहिजे, बंदुकीच्या गोळीने किंवा तलवारीच्या वाराने विचार मरत नाहीत, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेले आहे. तरीदेखील या समाजामध्ये कॉम्रेड पानसरे किंवा कुलबुर्गी यांच्या सारख्या विचारवंतांची हत्या केली जाते. मात्र, गेल्या सहा वर्षांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विवेकी विचारांचा जागर करण्याचे प्रयत्न या समाजामध्ये नेहमी चालू आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन राबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, आणि याचाच आढावा महाराष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी घेतला.

ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांनीदेखील समाजामध्ये वाढलेल्या अविवेकी आणि अलोकशाहीवादी तत्त्वांचा विरोध करणे ही काळाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात वंदनाताई शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ठाण्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश खैरालिया, नितीन देशपांडे, अरविंद तापोळे, सुरेंद्र दिघे, उन्मेष बागवे व मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते सामील झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details