नवी मुंबई - राज्यासह देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर मध्ये 3 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खारघर मधील सेक्टर 15 सील करण्यात आला आहे. खारघर मधील घरकुल वसाहत "कंटेन्मेंट" क्षेत्र म्हणून जाहीरकरण्यात आले आहे.
खारघरमधील घरकूल वसाहत "कंटेन्मेंट" क्षेत्र म्हणून जाहीर
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 15 मधील घरकूल वसाहतीत राहणाऱ्या तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे धरकुल वसाहत कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून जाहीरकरण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर सेक्टर 15 मधील घरकुल वसाहतीत राहणाऱ्या तीन जणांना कोरोना लागण झाली आहे. यामध्ये एका रिक्षाचालकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एका वसाहतीत चक्क तीन कोरनाबाधीत आढळले असल्याने, संबंधित क्षेत्र "कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. कोरोना विषाणू बाधित या घरकुल क्षेत्राची काळ्या रंगाने हद्द आखली असून संबंधित भागातील लोकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास, तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना सेक्टर 15 मध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कलम 2005 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल असे महानगरपालिकेचा अधिनियमात म्हंटले आहे.