महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लग्नाच्या हळदी समारंभात किरकोळ वादातून २ तरुणांवर चॉपर, तलवारीने हल्ला - गंभीर जखमी

सुनील धुमाळ या सराईत आरोपीने राजनच्या पोटात चॉपरने सपासप वार केले. तर, उमेशने तलवारीने हल्ला केला. यामध्ये राजन व त्याचा मित्र मयूर हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघेही जीव वाचवण्यासाठी हळदीच्या मंडपातून पळाले.

जखमी राजन

By

Published : May 18, 2019, 4:23 PM IST

ठाणे - लग्नाच्या हळदीत २५ ते ३० जणांच्या जमावाने किरकोळ वादातून दोघांवर चॉपर आणि तलवारीने हल्ला केला. ही घटना कल्याण तालुक्यातील म्हारळगाव येथे घडली. यामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
राजन हा परवा रात्रीच्या सुमाराला मित्रांसह इनोव्हा कारमध्ये लग्नाच्या हळदी सभारंभाला आपटी गावाला गेला होता. तेथील कार्यक्रम उरकून तो म्हारळ येथील हळदी समारंभात चालला होता. त्यावेळी आरोपी उमेशने राजनला भर रस्त्यात गाठून रस्ता तुझ्या बापाचा आहे का? कार नीट चालवता येत नाही का? असे म्हणत तो निघून गेला.
त्यानंतर गावातील हळदीत राजन हा त्याचा मित्र मयूर भोईर याच्यासोबत गेला होता. त्या ठिकाणी राजनवर आरोपींच्या जमावापैकी सुनील धुमाळ या सराईत आरोपीने राजनच्या पोटात चॉपरने सपासप वार केले. तर, उमेशने तलवारीने हल्ला केला. यामध्ये राजन व त्याचा मित्र मयूर हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघेही जीव वाचवण्यासाठी हळदीच्या मंडपातून पळाले. त्यावेळी अन्य हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने राजनच्या इनोव्हा कार आणि मोटारसायकलची तोडफोड केली.

जखमी राजनवर उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी सुनील धुमाळ, उमेश म्हसकरसह त्यांचे साथीदार जगदीश म्हसकर, अमोल भोईर, धीरज भोईर, नागेश यांच्यासह २५ ते ३० अनोखळी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले आहेत.

कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सर्व आरोपी म्हारळ गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details