महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganesh Chaturthi 2022 दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव महाराष्ट्रात होतोय साजरा, भव्य देखाव्यासह सामाजिक संदेश देण्याकडे मंडळांचा कल - Ganesh Festival celebration in Pune

Ganesh Chaturthi 2022 दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव Ganeshotsav 2022 साजरा करताना भक्तांचा उत्साह शिगेला, चांद्यापासून बांद्यापर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग होती.

Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022

By

Published : Sep 1, 2022, 9:50 PM IST

ठाणेजितेंद्र आव्हाड यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली, ती त्यांच्या कॉलेज वयापासूनच आणि तेव्हापासूनच त्यांनी सुरू केलेला ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरातला नर्व नरवीर तानाजी मित्र मंडळाचा गणेशोत्सव हा ठाण्यात मानाचा गणेश समजला जातो आणि याच गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे स्वतः पोहोचले. कॉलेजपासून या गणेशोत्सवाच्या मंडळाचे काम करत असताना जितेंद्र आव्हाडांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली आणि यातूनच अनेक मित्र देखील कमावले आणि ज्यांची साथ आजही त्यांच्या सोबत आहे. 1979 साली स्थापना झालेल्या या नर्विर तानाजी मित्र मंडळात सागरेश्वर ठाण्यात समाज प्रबोधन करणारा गणेशोत्सव म्हणूनही ओळखला जातो.

भंडारापोलिस अधीक्षक यांच्या कल्पनेतून पहिल्यांदाच पोलीस मुख्यालयात बाप्पा विराजमान झाले. एवढंच नाही तर पोलीस अधीक्षकांच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली आणि चक्क बाप्पाच्या साक्षीने अनेकांच्या तक्रारीचे निवारण झाले. जिल्ह्यात अनेक अर्जदार आणि गैर अर्जदारांनी यावेळी हजेरी लावित आपली कैफियत मांडली. काहींचे विषय तात्काळ मार्गी लागले तर काही बाबतीत सकारात्मक कारवाईचे आश्वासनही मिळाले.

अँधेरी जुहूबाप्पाचे धुमधडाक्यात आगमन झाले होते. परंतु आजच म्हणजे दीड दिवसांच्या बापाचा आज विसर्जन झाले. सध्या मुंबईतील जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गणेश भक्तांची गर्दी होणाऱ्या कारण की 2 वर्षाच्या कोरोना महामारीनंतर यावर्षी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होते. आणि त्याच मोठ्या प्रमाणावर विसर्जन सुद्धा होणाऱ्या, परंतु ज्या पद्धतीने भरती समुद्रात येत आहेत. त्याच पद्धतीने सुरक्षा करणे इथे उभे आहेत. त्याच्यानुसार बीएमसी कर्मचारी असतील पोलीस मेसेज असतील सर्व सज्ज झाले आहे. कारण की कोणतेही गैरसर होणे, यासाठी सर्व प्रशासन गणेश भक्तांचा विचारण्यासाठी सज्ज आहेत.

Ganesh Chaturthi 2022

पुणेगेल्या दोन वर्ष सर्वच सण- उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध मध्ये साजरा करावे लागले. यंदा मात्र निर्बंध मुक्त सर्व सण उत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सव देखील निर्बंध मुक्त होत असून प्रत्येक मंडळ तसेच नागरिक आपापल्या बाप्पाच आगमन हे मोठ्या उत्साहात करत आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील काल आपल्या घरी बाप्पाच आगमन केलं आहे. अतिशय सुंदर अशी सजावट बाप्पाची करण्यात आली आहे. यंदा जरी निर्बंधमुक्त गणेशउत्सव साजरा होत असलं तरी नागरिकांनी स्वतः हा जबाबदारी घेऊन गणेशउत्सव साजरा कराव असं आवाहन यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे.

मुंबईशहरात मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. आरे, इमारत पुनर्विकास आदी प्रकल्पसाठी मोठ्या संख्येने झाडांची कत्तल करण्यात येते. यामुळे मुंबईमध्ये झाडांची संख्या कमी आहे. झाडे नसतील तर आपला आपला विकास करून काय फायदा आहे. आपण श्वास घेणार कसा, असे प्रश्न उपस्थित करत आपल्याला प्राण वायू देखील विकत घ्यावा लागेल. प्राण वायू विकत घेण्यासाठी दुकानात जावे लागेल. यामुळे आता बाप्पा तूच मानवाला काही तरी शिकव असा संदेश विक्रोळी येथे राहणाऱ्या दर्शना गोवेकर- गायकवाड आणि नताशा पांगे यांनी यावर्षी आपल्या घरच्या गणपतीसाठी साकारलेल्या देखव्यामधून दिला आहे. मुंबईत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 710 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी घरगुती 247 मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

मुंबई विक्रोळी कन्नमवार नगर इमारत क्रमांक १६३, १६४ आणि १६५, साईनाथ चौक येथे साईनाथ गणेशोत्सव मंडळाकडून कोल्हालेश्र्वर मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे. या गणेशाला विक्रोळीचा विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते. मंडळाकडून गेले ५० वर्षे गणेशोत्सव साजरा केला जात असून त्यामधून सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत. यंदा मंडळाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत, या निमित्ताने फायाबरचा वापर करत अहमदनगर कोलाड गावातील कोल्हालेश्र्वर मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे.

खोतवाडीयेथील सार्वजनिक गणेशोत्सवा मंडळात त यावर्षी प्राचीन गुरुकुल संदर्भातील माहिती देणारी गुरुकुल स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये हनुमान परशुराम शुक्राचार्य अश्वधामा राजा बली यांच्यासारख्या महापुरुषांच्या संदर्भातील माहिती आणि त्यांचे परिचयासंदर्भातील माहिती या ठिकाणी फलक लोकांना कळण्यासाठी लावण्यात आले होते. खोतवाडी परिसर हा गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या मोठ्या उंचीच्या मुर्त्या आणि वेगवेगळ्या प्रदर्शनासाठी ओळखला जातो आहे. या परिसरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच प्रत्येक गणेश उत्सव मंडळ वेगवेगळ्या सामाजिक वेशभूषा साजरा करत असतो. यावर्षी खोतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 62 वर्ष पूर्ण झाले आहे.

पुणे दीड दिवसाच्या गणेशाच्या आज मोठया उत्साहात विसर्जन करण्यात आलं आहे. पुण्यातील दीड दिवसाच्या गणेशाचे आज मोठ्या भक्ती भावाने सर्वच नागरिकांनी विसर्जन केलेला आहे. त्याचबरोबर पुणे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सुद्धा मोठ्या वाचत गाजत आपल्या घरातील दीड दिवसाच्या गणपतीचे गरवारे कॉलेजच्या विसर्जन होदत आज विसर्जन केले. प्रशासनाच्या वतीने नदीपात्रामध्ये विसर्जन हौद तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर पुणे पोलिसांच्या वतीने सुद्धा आणि पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला होता. त्याचबरोबर अग्निशामक दलाचे काही जवान सुद्धा या ठिकाणी काम करत होते. कुठल्याही प्रकारची याची सर्व काळजी प्रशासनातर्फ सकाळपासूनच घेण्यात आली होती.

मुंबईत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 6034 गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी घरगुती 2120 मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

ठाणेआपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर गुरुवारी ठाणे जिल्यात दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. शहारत ठिकठिकाणी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या घोषणेने विसर्जन परिसर दणाणून गेला होता. ठाणे महापालिकेच्या वतीने पारसिक आणि कोलशेत रेतीबंदर तसेच मासुंदा तलाव, रायलादेवी तलाव, उपवन तसेच विविध ठिकाणी विसर्जन घाट तयार केले आहेत. विसर्जन घाट तसेच तलावांच्या ठिकाणी आरतीस्थानं, निर्माल्य कलश, वैद्यकीय पथक, cctv, फायर ब्रिगेड, विद्युत व्यवस्था महापालिकेच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विसर्जन ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्याकडे जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार सदा सरवणकर हेदेखील उपस्थित होते. काही दिवसापूर्वी देखील मनोहर जोशी यांची सदिच्छा भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. गेल्या दोन दिवस मुख्यमंत्री यांच्याकडून बऱ्याच नेत्यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बाप्पाचे देखील दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतले.

दोन वर्षाच्या कालावधीनंतर काल गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात व आनंदी उत्साहात झालं. असे असताना आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यामध्ये घरगुती गणपती बाप्पांच प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. अशातच या बाप्पांची दीड दिवस पूजा अर्चा केल्यानंतर आता या गणपती बाप्पाला निरोप देताना भक्तगणांना अश्रू अनावर झालेले आहेत.

आमदार निरंजन डावखरे ठाणे राज्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरण मध्ये पार पडत आहेत . भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले होते . बाप्पाच्या विसर्जनावेळी ठाण्यातील सर्व विघ्न दूर होवो. तसेच शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून लोकउपयोगी कामे होवो, अशी प्रार्थना आमदार निरंजन डावखरे यांनी बाप्पा चरणी केली आहे. राज्यात राज्य सरकारने सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्याची मुभा दिल्यानंतर राज्यभर गणेशोत्सवाचा सणाला उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक नेतेमंडळींची घरी देखील बाप्पा विराजमान झाले असून राजकीय मंडळींकडून वेगवेगळ्या मागण्या बाप्पाकडे करण्यात येत आहेत. आमदार निरंजन डावखरे यांनी बाप्पाच्या विसर्जनावेळी ठाण्यातील सर्व विघ्न दूर होवो अशी श्रीचरणी प्रार्थना केली आहे.

हेही वाचा३ MNS party workers arrest 3 मनसे कार्यकर्ते ताब्यात, मुंबादेवी परिसरात वृद्ध महिलेला मारहाण केल्याने कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details