मीरा भाईंदर (ठाणे)- भाईंदरमध्ये अनंत नाईक कुटुंबातील सदस्य मागील २१७ वर्षांपासून गणपतीची स्थापना करत आहे. आताची सहावी पिढी असून गणपती बाप्पाची मनोभावी पूजा करत आहे. पर्यावरणपूरक गणपती जरी नवी संकल्पना असली मात्र नाईक कुटुंबाचे वैशिष्ट्य असे आहे की २१७ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची स्थापना करत आहेत.
२१७ वर्षांपासून नाईक कुटुंबात पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे आगमन दोन मूर्त्यांचे वैशिष्ट्य...
अनंत नाईक कुटुंबाचा गणपती मागील २१७ वर्षापासून पिढ्यांनपिढ्या गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली जातेय. सन १८०४ मध्ये अनंत नाईक यांनी सुरुवात केली होती. गेल्यावर्षी जी गणेशाची मूर्ती आणली जाते त्या मुर्तीचे स्थापना येणाऱ्या गणेश चतुर्थी ला केली जाते. आणि अनंत चतुर्थीला विसर्जन केले जाते. असे मागील २१७ वर्षांपासून या कुटुंबाची ही परंपरा सुरू आहे. कुटुंबातील महिला सदस्य स्वतः मंत्रोउपचार करत पूजा अर्चना करत असतात. नाईक कुटूंबाचा गणपती जुना आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती आवर्जून दर्शनासाठी येत असतात.
सन १८०४ पासून होत आहे गणेशाचे आगमन -
२१७ वर्षांपासून गणपतीची स्थापना करत आहे सन १८०४ मध्ये गणपती बाप्पा आगमनाची सुरूवात झाली पुढे देखील कायम आहे.यामध्ये घरातील सर्व सदस्य गणेशोत्सव चे १० दिवस नव्हे तर ३६५ दिवस घरात गणेशाची पूजा करत असतात. अनंत नाईक यांनी त्यावेळी ठेवलेले काहिक दुर्मिळ मुर्त्या, वास्तू यांचे देखील जतन या कुटुंबातील सदस्य यांनी केले आहे. शहरातील सर्वात जुना घरगुती गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच इकोफ्रेंडली गणपती मूर्ती २१७ वर्षांपासून परंपरा कायम आहे.