ठाणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठी नाट्यप्रेमींकडून नाट्यगृहे उघडण्याची मागणी नाट्य रसिक आणि कलाकारांकडून होत असताना, ठाणे महापालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची २२ ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही. कारण या नाट्यगृहात अनेक तंत्रिक समस्या असून दुरुस्तीसाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.
राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृहे व मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे मराठी नाट्यरसिकांना पुन्हा नाटक पाहण्याची ओढ निर्माण झाली आहे. ठाणे शहराचे सांस्कृतिक प्रतीक म्हणून गडकरी रंगायतनची ओळख आहे. ठाणेकरांची नाटक पाहण्यासाठी पहिली पसंती गडकरी रंगायतनलाच असते. मात्र, आता नाट्यगृह सुरू होत असतानाच गडकरी रंगायतनचा पडदा महिनाभर उघडणार नाही व तिसरी घंटाही वाजणार नाही. ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम काढले असून, ते आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांबरोबरच रसिकांना नाटकालाही मुकावे लागेल.
नाट्यगृह बंद असताना दुरुस्ती का नाही केली?