ठाणे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या विरोधात समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला ( Ketaki Chitale ) ठाणे गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुणवण्यात आली. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीचा ताबा घेतला. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून आणलेला निखिल भामरे ( Nikhil Bhamre ) याला गुरुवारी (दि. 19 मे) न्यायालयात नेले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
निखिल शामराव भामरे ( वय 22 वर्षे, रा. पिंगळवाडे पोस्ट करंजाड, ता. सटाणा, जि. नाशिक, सध्या रा. आयोध्या पॅलेस, प्रभात नगर, मसरुळ, नाशिक ) याच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल केल्याने त्याला अटक करून नाशिक कारागृहात पाठविण्यात आले होते. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी (दि. 18 मे) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ताबा घेतला.