मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर शहराचे माजी महापौर तुळशीदास म्हात्रे यांचे सकाळी १०च्या दरम्यान निधन झाले, वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मीरा भाईंदरचे माजी महापौर तुळशीदास म्हात्रे यांचे निधन - Tulshidas Mhatre death news
शहराच्या जडणघडणीमध्ये म्हात्रे यांचा मोलाचा वाटा होता. म्हात्रे यांनी काँग्रेस पक्षाचा पाया मीरा भाईंदर शहरात रोवला.
शहराच्या जडणघडणीमध्ये म्हात्रे यांचा मोलाचा वाटा होता. म्हात्रे यांनी काँग्रेस पक्षाचा पाया मीरा भाईंदर शहरात रोवला. पक्षाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाचे काम त्यांनी केले. एक निष्ठावंत काँग्रेस समर्थक म्हणून त्यांनी पक्षाच्या पडत्या काळातदेखील पक्षासोबत राहणे पसंद केले. मीरा भाईंदर शहरात पक्ष संघटना त्यांनी वाढवली. महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तादेखील स्थापन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली.
म्हात्रे यांनी सरपंच म्हणून राजकारणाची सुरुवात करत काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, स्थायी समिती सभापती आणि महापौर अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. त्यांच्या जाण्याने मीरा भाईंदर शहरात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.