महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना न होताही आमदार क्वारंटाईन.. शोधून देणाऱ्यास एक रुपयांचे बक्षीस - किरीट सोमैय्या - किरीट सोमय्या

ओवळा-माजिवडा मतदारसंघात अज्ञातांनी 'कोरोना न होताही आमदार क्वारंटाईन" अशा आशयाचे फलक जागोजागी लावले आहेत. आधीच विविध आरोपांनी अडचणीत सापडलेले आमदार प्रताप सरनाईक यांची चर्चा पुन्हा ठाण्यात सुरू झाली आहे.

Flex against Shiv Sena MLA Pratap Saranaik
Flex against Shiv Sena MLA Pratap Saranaik

By

Published : May 26, 2021, 3:19 PM IST

Updated : May 26, 2021, 4:18 PM IST

ठाणे - ठाण्यातील ओवळा-माजिवड्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने (अंमलबजावणी संचलनालय ) छापा टाकल्यानंतर त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासुन आमदार प्रताप सरनाईक हे गायब असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. आणि आता तर ओवळा-माजिवडा मतदारसंघात अज्ञातांनी 'कोरोना न होताही आमदार क्वारंटाईन" अशा आशयाचे फलक जागोजागी लावल्याचे समोर आले आहे. आधीच विविध आरोपांनी अडचणीत सापडलेल्या आमदारांची चर्चा पुन्हा ठाण्यात सुरू झाली आहे..

शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील तसेच अन्य ठिकाणच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) छापेमारी करून शोध मोहीम सुरु केल्याने सरनाईक कुटुंबासमोरील अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी नोव्हे. २०२० मध्ये ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्याच्या प्रयत्नात सरनाईक कुटुंब क्वारंटाईन झाले होते. तर त्यांच्या सूनबाई खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. सरनाईक यांच्या नगरसेविका पत्नी परिषा सरनाईक यादेखील तेव्हापासून मानसिक तणावाखाली असल्याचे समजते. अशा परिस्थितीत आता सरनाईक यांच्या मतदारसंघात लागलेले 'फलक' चर्चेचा विषय बनले आहेत."कोरोना न होताही आमदार झाले क्वारंटाईन " असे फलक अज्ञातांनी लावल्याने सरनाईक टिकेचे धनी होत आहेत.

ठाण्यात शिवसेना आमदाराच्या विरोधात पोस्टरबाजी
मतदारांना मदतीची गरज -
एकीकडे कोरोना काळात सर्व लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात ठाण मांडून जनतेची मदत करीत असताना ओवळा-माजिवड्याचे शिवसेना आमदार गायब असल्याच्या तक्रारी येथील नागरीक करीत आहेत. अनेक कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत असताना सेनेचे हे आमदार कुठे आहेत, अशी विचारणा स्थानिक नागरिक करत आहेत.
शोधून देणाऱ्यास 1 रुपयांचे बक्षीस - किरीट सोमय्या
ठाण्यातील जनता अशा आमदारांना योग्य धडा शिकवेल, असा खोचक टोला मारत किरीट सोमैय्या यांनी आज पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली आणि आमदार प्रताप सरनाईक यांना शोधण्याचे आवाहन केले आहे.
काही वेळात काढले पोस्टर -
हे पोस्टर लागल्यानंतर काही वेळातच ठाण्यात हा चर्चेचा विषय झाला आणि मग कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने हे पोस्टर्स काढले. या पोस्टर्सवर कोणाचेही नाव नव्हते फक्त टोमणा मारण्याच्या उद्देशाने हे पोस्टर लावण्यात आले होते.
Last Updated : May 26, 2021, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details