ठाणे - कापूरबावडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये शॉकसर्किट झाल्याने आग लागली. यामुळे मॉलमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ बाहेर येत होते. आग लागल्याचे लक्षात येताच तत्काळ दुकानदार व नागरिकांना बाहेर काढण्यात आले. महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून धूर बाहेर जाण्यासाठी मॉलच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
ठाण्यातील सिटीसेंटर मॉल पेटला; आगीत अडकेली व्यक्ती रुग्णालयात दाखल - fire in lake city mall
लेक सिटी सेंटर मॉलमध्ये शॉकसर्किट झाल्याने आग लागली. यामुळे मॉलमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ बाहेर येत होते. धूर बाहेर जाण्यासाठी मॉलच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
लेक सिटी मॉलमध्ये शॉकसर्किट झाल्याने आग लागली.
अथक प्रयत्नानंतर तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, धुरामध्ये एकजण अडकल्याचे लक्षात येताच त्याला रेस्क्यू करण्यात आले. संबंधित व्यक्तीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.