महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल परिसरात भीषण आग; जीवितहानी नाही

डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल परिसरातील हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत आग लागली असून अग्नीशामक दलाला त्यावर ताबा मिळवण्यात यश आले आहे.

fire in new mumbai
डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल परिसरातील हॉस्पीटलच्या नवीन इमारतीत आग लागली असून आग्नीशामक दलाला त्यावर ताबा मिळवण्यात यश आले आहे.

By

Published : Mar 18, 2020, 3:23 PM IST

Updated : Mar 18, 2020, 3:32 PM IST

नवी मुंबई -डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल परिसरातील हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत आग लागली आहे. संबंधित आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांना आगीवर ताबा मिळवण्यात यश आले आहे. हे हॉस्पिटल मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने काही काळ वाहतुकीला अडचण झाली होती.

डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल परिसरातील हॉस्पीटलच्या नवीन इमारतीत आग लागली असून आग्नीशामक दलाला त्यावर ताबा मिळवण्यात यश आले आहे.

आज दुपारच्या सुमारास थर्माकाॅल मटेरियलला आग लागली; आणि काहीच वेळात आगीने भीषण रूप धारण केले. इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने या ठिकाणी कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. आग लागल्याचे कळताच डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल प्रशासनाने अग्निशामक दलाला त्वरित पाचारण केले. यामुळे वेळेत ताबा मिळवण्यात यश आले आहे.

Last Updated : Mar 18, 2020, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details