महाराष्ट्र

maharashtra

गळतीमुळे महानगर कंपनीच्या गॅस वाहिनीला आग; स्थानिकांच्या सतर्कतेमुळे धोका टळला

By

Published : Jun 2, 2020, 8:22 PM IST

घरगुती इंधन पुरवणाऱ्या महानगर कंपनीच्या गॅस वाहिनीने पेट घेतल्याची घटना वर्तकनगर येथील रुणवाल प्लाझा परिसरात घडली. या दुर्घटनेमुळे परिसरातील सुमारे 200 ग्राहकांचा गॅस पुरवठा काही कालावधीसाठी बंद करण्यात आला होता.

gas leakage in thane
घरगुती इंधन पुरवणाऱ्या महानगर कंपनीच्या गॅस वाहिनीने पेट घेतल्याची घटना वर्तकनगर येथील रुणवाल प्लाझा परिसरात घडली.

ठाणे - घरगुती इंधन पुरवणाऱ्या महानगर कंपनीच्या गॅस वाहिनीने पेट घेतल्याची घटना मंगळवारी वर्तकनगर येथील रुणवाल प्लाझा परिसरात घडली. या दुर्घटनेमुळे परिसरातील सुमारे 200 ग्राहकांचा गॅस पुरवठा काही कालावधीसाठी बंद करण्यात आला होता. दुरूस्तीनंतर पुन्हा गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

घरगुती इंधन पुरवणाऱ्या महानगर कंपनीच्या गॅस वाहिनीने पेट घेतल्याची घटना वर्तकनगर येथील रुणवाल प्लाझा परिसरात घडली.

शहरातील वर्तकनगर भागात अप्पासाहेब पवार उद्याानालगत ही घटना घडलीय. मंगळवारी(२ जून) गॅस वाहिनीतून दुपारी दिडच्या सुमारास अचानक गळती होऊ लागली. यानंतर काही काळातच या ठिकाणी आग लागली. आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्नीशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत महानगर गॅसचे कर्मचारी देखील पोहोचले. तातडीने गॅस पुरवठा बंद करून दुरूस्ती करण्यात आली.

यानंतर पुन्हा गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी अधिक माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details