महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तुर्भे येथील युनियन बँक असलेल्या इमारतीला आग - thane news

नवी मुंबईतील तुर्भे येथील एपीएमसी मार्केट जवळील युनियन बँक असलेल्या इमारतीला आज रात्री आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत

By

Published : Apr 17, 2021, 9:20 PM IST

नवी मुंबई -नवी मुंबईतील तुर्भे येथील एपीएमसी मार्केट जवळील युनियन बँक असलेल्या इमारतीला आज रात्री आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

तुर्भे येथील सेक्टर 19 मधील एपीएमसी मार्केट कम्युनिटी एक्सचेंज बिल्डिंग माथाडी चौक जवळ युनियन बँके असलेल्या इमारतीला आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन जवानांच्या मार्फत आग विझवण्याचे काम चालू आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं मुश्किल झालं आहे. संबंधित इमारतीत मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. आज शनिवार असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतींत फारसे कोणी नव्हते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीबद्दल पुढील तपशील येणे बाकी आहे.

तुर्भे येथील युनियन बँक असलेल्या इमारतीला आग

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details