महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बारमधील गायिकेच्या १३ वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या - काशिमीरा पोलीस

मिरारोडच्या शांती पार्कमध्ये हिना सिंग नामक महिला ( bar singer woman son murder ) आपल्या दोन मुलांसह राहत आहे. हिना सिंग बोरिवलीमधील एका बारमध्ये गायक म्हणून काम करते. तिच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे.

मीरारोड गुन्हे
मीरारोड गुन्हे

By

Published : Aug 3, 2022, 10:25 AM IST

मीरा भाईंदर ( ठाणे) - मिरारोडमधील १३ वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना ( Meera road crime news ) समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत ( Meera road police ) आहे.

मिरारोडच्या शांती पार्कमध्ये हिना सिंग नामक महिला ( bar singer woman son murder ) आपल्या दोन मुलांसह राहत आहे. हिना सिंग बोरिवलीमधील एका बारमध्ये गायक म्हणून काम करते. यामधूनच आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहे. नेहमीप्रमाणे हिना रविवारी कामावर गेली. रात्री १२ च्या सुमारास घरी आल्यावर माहिती मिळाली की, मुलगा मयांक (१३) घरात नाही आहे. हिना यांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात ( Kashimira Police ) तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

पैशाच्या हव्यासापोटी खून-मंगळवारी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील वालीव हद्दीत मयांकचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत दोघांना अटक केली. यामध्ये अफझल अन्सारी (२२) आणि इम्रान शेख (२४) यांना अटक केली. मयांकची आई बारमध्ये काम करते. त्यामुळे खूप पैसे असणार असे त्यांना वाटले. याचा कारणाने त्यांनी मयांक यांचे अपहरण करत २५ लाखाची खंडणी मागितली. त्यांनी मयांक याचा खून केला. त्यांच्याच मोबाईलवरून २५ लाखाची खंडणी मागितली अशी माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details