महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Eknath Shinde : शक्तिप्रदर्शन करत खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसेना पक्षप्रमुखांना सवाल - महाराष्ट्रात राजकीय संकट

गेली अडीज वर्ष अनैसर्गिक आघाडीला आम्ही कंटाळलो होतो. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( Nationalist Congress ) दुय्यम वागणूक शिवसैनिकांना मिळाली. महा अघाडी सरकारमुळे ( Mha Aghadi Government) पक्ष वाढीसाठी अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करीत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंड करत गुवाहटी गाठली आहे. शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी ठाण्यातील शिवसैनिकांनी शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Guardian Minister Eknath Shinde ) यांच्या निवासस्थानी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

http://10.10.50.85//maharashtra/25-June-2022/mh-thn-04-srikant-sinde-7104282_25062022183117_2506f_1656162077_434.jpg
शक्तिप्रदर्शन करत खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसेना पक्षप्रमुखांना सवाल

By

Published : Jun 25, 2022, 7:54 PM IST

ठाणे -गेली अडीच वर्ष अनैसर्गिक आघाडीला आम्ही कंटाळलो होतो. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( Nationalist Congress ) दुय्यम वागणूक शिवसैनिकांना मिळाल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. महाविकास अघाडी सरकारमुळे ( Mha Aghadi Government) पक्ष वाढीसाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंड करत गुवाहटी गाठली आहे. शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी ठाण्यातील शिवसैनिकांनी शनिवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Guardian Minister Eknath Shinde ) यांच्या निवासस्थानी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

शक्तिप्रदर्शन करत खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसेना पक्षप्रमुखांना सवाल

थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सवाल -एकनाथ शिंदे यांचे पुत्र तसेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे ( MP Shrikant Shinde ) यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्यातील शिवसैनिक एकत्र येत शिंदे यांना पाठिंबा ( Support to Shinde ) दर्शीवला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षासाठी काय काय नाही केले. गेली 40 वर्ष एकनाथ शिंदे यांनी कष्ट करून पक्ष वाढवला. राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत. पक्ष वाढीसाठी शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे काय चुकले ? असा थेट सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details